Monday, April 27, 2009

Ecstasy...

Have you ever had a feeling, reading a book, that is simply written for you!! Situations in book or references match precisely with thoughts in your mind!

Monday, April 13, 2009

पहाडांच्या राणीच्या राज्यात.....

शेवटच्या क्षणापर्यंत हो-नाही हो-नाही करत शेवटी आम्ही निघालो पहाडांच्या राणीच्या राज्यात म्हणजेच Ooty... बसची tickets वगैरे आधीच बुक करुन झाली होती पण वीकएन्डला ऑफिसमधे जावं लागलं तर काय?(हा प्रश्न आता नेहमीचाच झालाय...) हा सगळा विचार करुन Ootyची trip organize केली होती.
सुरुवातच जरा दणक्यात झाली. हां, आता बावळटपणाला असं काही म्हटलं तरचं मजा येते! बसमध्ये चढल्यावर ticket काढल्यावर स्टेशनवर पोहोचायला उशीर होईल म्हणून रिक्शानं जायचं ठरवलं आणि कंडक्टरला tickets परत देवुन बाहेर पडलो पैसे परत न घेताच(जेव्हा KSRTCचं ticket दाखवलं असतं तर तिcकेत काढण्याचिही गरज नव्हती. ) पाच लोक शेवटी कसरत करत शांती नगर स्टेशनवर पोहोचलो. बरोबरची काही मंडळी अगोदर जाऊन 'हिरवळीचा' आनंद घेण्यात मग्न होती... :)
बसमध्ये चढल्यावर जवळ-जवळ अर्धातास बुक केलेल्या जागा शोधण्यात गेला(कारण internetवर दाखवलेली arrangement प्रत्यक्षात असलेल्या जागांपेक्षा वेगळी होती!) पण मग थोडसं recommend करून जागा पदरात पाडून घेतल्या! रात्रीचा प्रवास, बसच्या शेवटच्या seats आणि खडबडीत रस्ता म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदी जुळून आल्या सारख्या!!
दुसय्रा दिवशी सकाळी ऊटीमध्ये पोहोचलो. मग प्रश्न होता hotel शोधण्याचा! त्याला फार वेळ लागला नाही(कारण? आधी organize केलेल्या trips! :)) एक पुर्ण दिवस उटीमध्ये फिरुन दुसरा दिवस Coonoor फिरण्याचा plan होता. फ्रेश होऊन breakfast करुन Ootyमध्ये फिरण्यासाठी cab केली आणि निघालो! पहिला spot होता डोडाबेट्टा. म्हणे साऊथ मधलं सर्वात ऊंच पठार कि काय(वाटलं तर नाही!) Ooty असुनही दुपारी ऊन होतं त्यामुळे प्र्त्येकाच्या तोंडात 'अरे, वाटतंच नाहिये उटीमध्ये आहोत' हे वाक्य होतं.
त्यानंतरची जागा होती tea factory! चहा कसा बनतो ते पाहिलं. आणि १५०० चा फक्त चहा घेऊन बाहेर पडलो! :D त्यानंतर गेलो Pykara lakeला...! कोणत्या प्रकारचे boating करायचे यावरून थोडे वाद झाले पण 'knowledge Transfer' करणाय्रा लोकांनी 'सर्वां'चे purpose विचारात घेवून pedal आणि motor असं वाटून घेतलं!
सगळीकडे हिरवीगार झाडी, शांत, सुंदर तळी, आणि प्रसन्न वातावरण! खुप खुप छान वाटत होतं...
जवळपास चार वाजता जेवण करून निघालो Pykara waterfallsच्या वाटेने... बर्फाप्रमाने थंड पाणी आणि धबधबा! पाण्यामधे मनसोक्त डुंबून झाल्यावर आम्ही होतो film shooting pointवर. (तिथे म्हणे माधुरीच्या 'साजन' पिक्चरचं shooting झालेलं, गाणं- 'मेरा दिल भी कितना पागल है!(सौजन्य- Mr. Nimodiya)' :P :P) थोडिशी थंडी जास्त वाटू लागली होती पण गरमीने हैराण झालेल्या जिवाला छान वाटत होतं. कोणाची घोडेस्वारीची स्वप्न पुर्ण झाली! कुडकुडत्या थंडीत चहाची अवीट गोडी चाखायला मिळाली... पुन्हा रुम्सवर येवून परत डिनरसाठी बाहेर पडलो!
दुसरय्रा दिवसाची सुरूवात अर्थातच लौकर झाली. कारण कुन्नूरसाठी ट्रेन होती सकाळी ९ वाजता! स्टेशनवर पोहोचताच आनंदाला पारावार उरला नाही कारण ट्रेन होती पिक्चरमधे असावी तशी! मोजून चारचं डबे, निळ्या-हिरव्या रंगांचे! फोटो सेशन करतचं ट्रेन सुरू झाली! चित्रात असावा तसे भोवती देखावे, कौलारू घरं, पहावं तिकडे चहाचे मळे! तजेला देणारी हवा आणि थंडगार वातावरण! मोजक्याच स्टेशन्सवर थांबत ट्रेन पोहोचली कुन्नूर स्टेशनवर!
पुन्हा एकदा cab आणि पाहण्याच्या जागा ठरवून निघालो. पहिल्याच spotवर थोडेसे रेंगाळून आणि first class मसाला चहा घेवून पुढे निघालो. मधेच एका चहाच्या मळ्यात थांबलो. मग 'Dolphin Nose' नावाचा एक spot होता. सगळीकडे पसरलेल्या डोंगररांगा, ढग... तिथून आम्ही पुन्हा एकदा एका चहाच्या मळ्यात गेलो. इथे जरा जास्त वेळ थांबून basket घेऊन चहा तोडण्याचा प्रयोगही करून पाहीला. एका restaurant मधे जेवण करून Sims Gardenमधे गेलो. ४:३० ची ट्रेन होती कुन्नूर ते उटी त्यामुळे बागेतच tp करत वेळ काढला. तिथे एका पुण्याच्या माणसाचं पैशाचं आख्खं पाकीट सापडलं होतं त्यामुळे मंडळी त्याचा contact number मिळवण्याच्या मार्गावर होती.
परत उटीत येताना सर्व ९ जण (४+४+१ किंवा ५+४ जे असेल ते :) ) Ooty lakeवर एक फेरफटका मारून cloak roomमधून सामान परत घेवून रस्त्यांवर भटकत बसलो.वाटेत थोडसं थांबत, खात-पित शेवटी एका मराठी थाळी मिळत असलेल्या hotelमधे पोटभर जेवलो! सगळे अक्षरश: तुटून पडले होते. मग थोडफार shopping करून शेवटी बसची वाट बघत बस standवर आलो. खुप थकल्यामुळे standवरचं बैठक मारून बसताना कोणी फार विचार केला नाही!
प्रत्येक प्रवास नवं काही देवून जातो, नवं काही शिकवून जातो.... पण तोही कधीतरी संपतोच कदाचित एका नविन प्रवासाच्या सुरुवातीसाठी........