Monday, September 13, 2010

केरळमधील टेकडी, मुनार...!

               नेहमीप्रमाणे नाही-हो करत tripचं ठरत होतं, यावेळी आमचं न जाण्याचं कारण वेगळं होतं पण जाण्याचीसु्द्धा खुप ईच्छा होती. आणि ३ दिवसांच्या सुट्टीमधे करायचं तरी काय याचा backup plan नव्हता. ९ तारखेला रात्री निघण्याचं ठरलं, गाडी ठरलेली, लोकं ठरलेली. सगळं खाण्या-पिण्याचं सामान अन मोजक्या लागणाय्रा गोष्टी सोबत घेवून Spencersमधून निघालो (मी, रश्मी, मंगेश, सुमंत आणि वैष्णव. नावं लिहीत आहे कारण पुढे लागणार आहेत :P). जवळुनचं बाकी मंडळींना pickup करायचं होतं (रोहीत, गोपाल, अमीत, संदीप  कॉलेजचे सिनीयर आणि त्यांचे मित्र). अनोळखींशी ओलख करुन झाल्यावर 'गणपती बाप्पा मोरया!!' ने प्रवास सुरू झाला!

               गाण्याच्या भेंड्या खेळत actually गाणी ओरडत, नवीन मुव्हीजची गाणी ऐकत, झोपत(मंगेश सोडून :P) दूपारी १२ला टेकडीला पोहोचलो! रहाण्याची सोय एका Rolex नावाच्या हॉटेलमधे केली अन् fresh होवून टेकडीवर boatingसाठी निघालो. खुप भूक लागली होती. South Indian Meal was the best option! आणि ते होता पण बेस्ट!! २ तासांच्या बोटींग मधे थोडसं बोअर होत, wild life ऐंजॉय करत, ते घाणेरडं लाईफ जाकेट अडकवून कसेतरी ते २ तास घालवले. परत हॉटेल रूम्सवर परतलो. रात्रभरच्या प्रवासाचा थकवा जाणवत होता आणि जवळ असलेल्या भेळीवर सगळ्यांनीच ताव मारला..! थोडसं रस्त्यांवर फिरलो आणि रात्रीच्या जेवणाची जागा ठरवली आणि जेवलो व हॉटेलवर आलो. मुलांचे पत्त्यांचे डाव रंगले मी आणि रश्मी गप्पा मारत झोपून गेलो. दुसय्रा दिवशी सकाळी लौकर उठून समोरच्या चर्चमधे जाऊन आलो. प्रार्थनापण ते लोक मल्ल्याळम मधे करत होते! सकाळी सकाळी 'अप्प्म' नावाचा केरळमधील पदार्थ खाल्ला आणि मुनारच्या दिशेने निघालो!

                  यावेळी गाडीतून जाताना दमशेराज् खेळत होतो. बाहेर वेड लावणारा निसर्ग होता. हसत्-नाचत् जात होतो पण घाटांचा रस्ता म्हटलं की होणारा त्रास आलाच! गाडी थांबवत इतरांच्या सहनशक्तीचा अंत बघत गाडी पुढे जात होती. या सगळयाला कंटाळून(!) संदीपने रस्त्यामधेच बैठक मांडली! पुन्हा continue करत पुढे 'पेरीयक्कम' नावाचा waterfall वाटेत लागला. मुनारला पोहोचलो तर दुपारचे ३ वाजले होते. ड्रायवर काकांची चिडचीड, प्रत्येकाचं असं-नाही-असं-करु ऐकत मंगेश full too formमधे होता :P . एक मस्त Home Stay शोधून काढलं होतं. सगळं सामान तिकडे फेकून एका गाईड सोबत जागा बघायला निघालो. त्या दिवसाच्या scheduleमधे वेळ खुपचं कमी ऊरला होता! एका Blossom Garden नावाच्या पार्कमधे गेलो. बाग अगदीच ठीक होती पण फुलांचे फोतो काढण्याचे किडे डोक्यात होते ती आणि झोके खेळण्याची ईच्छा पुर्ण झाली! :P  पुढची जागा होती एक waterfall. तिथे photo sessions करून घरी परत आलो. ७ वाजले तर काय अंधार पडलेला! आणि रात्रीच्या जेवणाची सोय तिथेच असल्याने खुश होतो. एका अप्रतिम घरच्या जेवणाचा आनंद मिळाला. अरे हो! त्या आधी गणेश चतुर्थी होती म्हणून गणपतीची आरती केली आम्ही सगळ्यांनी..!! जेवण झाल्यावर रात्री शतपावली करायला घराजवळच्या रस्त्यावर फेरफटका मारून आलो.

                 दिवसा इतकीच, कदाचित थोडी जास्तचं मजा रात्री आली! :P पत्त्याचे १०८, Challenge आणि Future prediction हे खेळ खेळताना..! १०८ चे "rules are rules!", Challengeमधे केलेलं ब्लफ.. आणि interesting future predictions! त्यामधे futures predict केले काही. ते मी enlist करतेच!
(सुमंत - १. कोणाला onsite opportunity मिळेल? २. कोण पुण्याला सगळ्यात आधी जाईल? ३.कोणाचा cell phone हरवेल?
संदिप - १. कोण गाडीत उल्टी करेल? २. कोण driverशी भांडण करेल? ३. कोण सगळ्यात आधी मरेल?
रोहीत - १. कोण Bangaloreमधे settle होईल? २. कोणाची बायको/नवरा सोडून जाईल? ३. कोणाला ३ मुलं होतील?
गोपाल - १.कोण सगळ्यांना ice-cream देईल? २. कोणाचं love marriage होईल? ३. कोण first resign करेल?
अमित - १. कोण सगळ्यात आधी Car विकत घेणार? २. कोण सगळयात आधी झोप्णार? ३. कोण IT field आधी सोडणार?
रश्मी - १. कोण overweight होणार? २. whose spouse will have extra-marital affair? 3. कोणाला hike मिळणार?
मी - १. कोणाला सगळ्यात आधी मूल होणार? २. कोणाची २ लग्न होणार? ३. कोणाचं परभाशिकाशी लग्न होणार?
मंगेश - १. कोणाचं सगळ्यात आधी लग्न होणार? २. कोण २ वेग्-वेगळे socks घालणार?
वैष्णव - १.कोण घरी भांडून लग्न करणार? २.? ३.?   ) त्या सगळ्या predictionsच्या चिडवा-चीडवी मधे रात्रीचे १२-१ वाजले!

                दुसय्रा दिवशी सकळी ७ला घरामागच्या जंगलात आम्ही ३-४ लोकं गेलो काय तर म्हणे trek करुया! मजा आली, पेरु, चिंचा पाडल्या (संदिप आणि ववैष्णवला special thanks! :)). आवरा-आवर करून निघायला ९ वाजलेच! आता प्रवास परतिचा होता आणि वाटेत येणाय्रा जागा पाहण्याचा! दूरवर जिकडे पाहू तिकडे चहाचे मळे, धुकं. मस्त थंडी हवा! खुप सुंदर नजारे परत जावसंच वाटू नये! सकाळचा नाश्ता एका हॉटेलमधे 'इडियप्पम्' आणि The Best चहा, कॉफीने झाला. मसाले, काजू, पदीमुकम अशा तिथे खास मिळणा-या गोष्टींची खरेदी करुन पुढे निघालो! टी गार्डनमधे न जाता trip पुर्ण कशी होईल? तर तिथे सुद्धा थोडावेळ फोटोज् काढले. नेक्स्ट जागा होती एक national park. जे आम्ही skip केलं. त्यानंतरची जागा होती एक waterfall. त्याचं नाव होतं 'लोक्कम्'. (ह्या लोकांच्या नावांमधे इतके जोडून शब्द का असतात :P). तिथे काही लोकांनी मनसोक्त डुंबून, तर काहींनी थोडेसे पाय ओले करून तर काहींनी सामानाची काळजी घेवून आपापल्या परीने आनंद लुटला!

                तिथून पुढे आता direct बैंगलोरलाच मधे-अधे कुठेही वेळ वाया न घालवता जाण्याचं ठरलं! मधे एका जागी मोठ्या-मोठ्या शहाळ्यांच पाणी पिलं आणि  खलनायक, बाजीगर अश्या moviesचि all time favorite गाणी ऐकत केरळ, तमिळनाडु borders cross करत होतो. मधे एका जागी paper dosa खाल्ला रात्रिचं जेवण मिळणार नाही अशा तयारीने ! तिथून पुढचा प्रवास NH चा असल्याने fast होता. जोक्स सांगत्-ऐकत, irrelevant बोलत आणि झोपत प्रवास चालू होता. उठलो तेव्हा Marthahalli आलं होतं! Hats off to Mangesh's patience for talking to driver n leadership he taken! (खुश का?!! :P)



P.S. Comments are welcome if I have missed any of the event or happening incident!!