Thursday, April 5, 2012

अजून..

संदिप खरे यांच्या 'अजून उजाडत नाही गं' कवितेतील खूप सुरेख ओळी आहेत ह्या.(कारण काही असो मनाला स्पर्शून जातात). नेहमीच संकटाला सामोरा जाणेच अवघड असं काही नाही. त्यानंतर येणारा काळ हा कधी कधी ती गोष्ट सावरल्या नंतरही जास्त भयानक असू शकतो.. नाही!

"एकच पळभर एखादी कळ अशी सणाणून जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे लख्ख काही चमचमते ग
ती कळ सरते, हुरहुर उरते अन्‌ पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण, काही आतून उमलत नाही ग
अजून उजाडत नाही ग !"