Wednesday, August 5, 2009
जाने हमको क्या पाना है....
'मला ना, GATE द्यायचीये पण अभ्यासच नाही होत आहे यार', 'मला बोअर झालयं तेच तेच काम, job change करायचाय', 'मला अरे swimming शिकायचयं', 'मला काहीतरी exicting करायचयं' अशी वाक्य दर दिवसा आड ऐकायला येतात आणि माझ्या मनात सुरू असलेल्या अशाच विचारांना अधिकच गती मिळते! म्हणजे होतं असं की To Do ची list वाढतेय पण done ची list आहे तशीच आहे! असं का होतं वगैरे गोष्टींचा विचार करून काही उपयोग नाही असा निष्कर्ष मनाने केंव्हाच काढलायं. खुप नकारार्थी वाटत असेल बोलणं पण खरं आहे तिकचंच... असं नाहिये की जे काम मी करतेय ते मी enjoy करत नाहीये किंवा मजा येण्यासारखं आयुष्यात काही घडत नाहिये, पण दिशाहीन झालोय किंवा धेय्य नाहीये कुठलं डोळ्यांसमोर असं काहिसं... 'जाने हमको क्या पाना है, सोचो क्या है अपनी मंजिल...'
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
true :)
hmmm. very true re.
Same is my condition...
The perils of being a good software professional.....
Post a Comment