Thursday, March 25, 2010

हरवणे...

हरवणे ही प्रक्रिया नेहमीच जरा त्रासदायी वाटते ना..
 म्हणजे लहानपणी चौथीत असताना.. बाबांनी दिलेलं पहीलं शाईचं पेन.. हरवलं??? खुप खुप शोधलं अगं.. पण सापडलंच नाही.. खुप आवडणारं कानातलं.. इथंच तर ठेवलेलं... कुठे गेलं मग...?? नीट ठेवायची राणी कागदपत्र कॉलेजच्या अडमिशनच्या रांगेत उभं असताना ऐकावं लागणारं लेक्चर..! अगदी कहर म्हणजे स्वत:च्या पहिल्या पगारातून खरेदी केलेला महागडा मोबाईल फोन..!
हरवला...!!! :(

हरवणे हे नेहमीच सोबत त्रास, दु:खं, वेदना, यातना असं काही-बाही घेवून येतं.. जादुची कांडी फिरेल आणि ती गोष्ट डोळ्यांसमोर येईल असं वाटंत रहातं..

काही काळाने ती गोष्ट नसण्याचीही सवय होउन जाते.. आणि त्या नसलेल्या गोष्टीच्या असलेल्या आठवणींनी आपण स्वत:ला सावरतो..

वस्तूरुप गोष्टींसोबत असंही काही असतं जे आपण काळानूरूप हरवतो.. लहानपणीचं निरागसपण.. त्यानंतरचं अल्लडपण.. अस बरंच काही..

जुने.. मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेले क्षण.. काळाच्यापडद्याआड किती सहजपणे (?) विरुन गेलेत.. हरवून गेलेत..आहेत फक्त आठवणी... ते सगळं हरवलय याची जाणिव करुन द्यायला...

2 comments:

akshay said...

http://niwaant.blogspot.com/2009_03_01_archive.html

FrostBite said...

Very touching......